About Us

Welcome To शामराव पेजे स्मृति न्यास

लोकनेते शामरावजी तथा अण्णासाहेब पेजे म्हणजे कोकणातील कुणबी व त्या समाजासारख्याच दुसऱ्या श्रमजीवी, कष्टकरी वर्गाच्या अन्यायाला वाचा फोडणारे नेतृत्व. सर्वसामान्य गोरगरीब, दलित पीडित जनतेची निःस्वार्थपणे आयुष्यभर सेवा करणारे झुंजार नेतृत्व. जनतेने दिलेली असंख्य पदे भूषवूनही कसलाही डाग न लागलेले निष्कलंक नेतृत्व. आमदार झाले. खासदार झाले पण आपल्या जनेतेचे कायम 'अण्णा' म्हणजे मोठे बंधू-हेच नाते कायम राखले. आपल्या सामान्य मतदाराचेच जीवन ते जगले. त्यांच्या या चारित्र्यसंपन्न जीवनाचे त्यांना निर्भय बनविले. साऱ्या महाराष्ट्रभर त्यांच्या निर्भयपणाचा, स्पष्टवक्तेपणाचा लौकिक आहे.

गौरव कर्तृत्वाचा

लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास या बहुउद्देशीय लोकोपयोगी ट्रस्ट च्या सामाजिक शैक्षणिक चळवळीचे ध्येयानुसार न्यासाने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये वृक्ष लागवड करण्याचे योजिले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील सह्याद्रीच्या माथ्यावरील दुर्गम अशा 'माचाळ' या ब वर्गातील पर्यटन गावांत रक्त चंदन आणी मसाला रोपे इत्या. चे वाटप न्यासाचे अध्यक्ष मा.ॲड सुजित झिमण. यांचे हस्ते समस्त माचाळ ग्रामस्थांना करण्यात आले. या प्रसंगी न्यासाचे विश्वस्त (डाॅ.दिलीप नागवेकर .विवेक राव सावंत) तसेच महिला -विद्यार्थी वर्ग - मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

या प्रसंगी न्यासाचे अध्यक्ष मा.सुजित झिमण यांनी माचाळवासीयांना पर्यटन केंद्र झाल्यामुळें तद् अनुषंगाने होणारे फायदे तोटे यांचे सविस्तर विवेचन केले. स्वातंत्र्या नंतर दुर्लक्षित झालेले गाव आज विवेकराव सावंत यांच्या मुळेच प्रसिद्ध झाले आहे .या कामी त्यांनी घेतलेली मेहनत अतुलनीय आहे. आता तुमच्या घरा दारा पर्यंत रस्ता आला आहे.पण आता इथेच थांबुन चालणार नाही.स्व.लोकनेते शामराव पेजे यांना अभिप्रेत असणारा समाज विकासाच्या, कल्याणाचा कल्पना आणखी ध्येय तळागाळातील शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी न्यास कटीबद्ध आहे. फक्त आज नाहीतर पुढेही कायम पणे न्यास तुमच्या साठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणखी आधार देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले..

या नंतर शामराव पेजे न्यासाचे विश्वस्त आणी माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सह.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेकराव सावंत यांनी माचाळ गाव नुसते पर्यटन केंद्र होऊन चालणार नाही तर गांव विविध मार्गांनी स्वयंपुर्ण होउन आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. पारंपरिक शेती व्यतिरिक्त सर्वप्रकारच्या जोडधंद्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याच करिता न्यासाने अश्या दुर्गम भागातील समाजाकडे लक्ष दिले पाहिजे असे मत न्यासाचे अध्यक्ष मा सुजित झिमण यांच्या कडे व्यक्त केले होते.न्यासाचे अध्यक्ष आणी सर्वच विश्वस्तांनी या सुचनेचा सन्मानपूर्वक विचार केला.आणी गेल्या वर्षी रत्ना आणी केशर या आंबा कलमांचे वाटप केले. आणखी आज ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्त चंदन या मौल्यवान वृक्षांची , मसाला रोपे देणगी दिली.

भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त "लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास" या लोकोपयोगी ट्रस्ट च्या सामाजिक व शैक्षणिक ध्येयानुसार लांजा तालुक्यातील सह्याद़ीच्या माथ्यावरील अती दुर्गम असलेल्या जिल्यातील पहीले 'ब' वर्गिय हिल स्टेशन म्हणून नाव लौकिक मिळवलेल्या माचाळ येथील स्थानिक महिला ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांना केशर /रत्ना या जातीच्या आंबा कलमांचे वाटप करण्यात आले. या वेळी न्यासाचे सदस्य मा.जी बी चाळके साहेब यांनी कलम लागवडीचे ऊद्देश आणी लागवडी संबधाने घ्यावयाची काळजी या संबधाने विस्तृत माहीती दिली लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यासाचे गणेश जोशी यांनी लोकनेते पेजे साहेबांच्या जिवन प्रवासाचा आढावा घेऊन या न्यासाची सामाजिक जाणीव आणी जबाबदारी मुळे या दुर्गम भागात पोहचलो असल्याचे सांगितले

कुणबी समजोन्नती संघ मुंबई अंतर्गत कुणबी जोडो अभियान याअंतर्गत दुचाकी रॅलीचे आयोजन रत्नागिरी / २ डिसेंबर २०२२ रत्नागिरी/ तन्मय दाते: कुणबी समजोन्नती संघ मुंबई अंतर्गत कुणबी जोडो अभियान याअंतर्गत शुक्रवारी शहरातील मारुती मंदीर, जयस्तंभ, माळनाका, ते कुणबी भवन याठिकाणी शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये शांताराम मालप, विलास सनगरे, अशोक वालम, तानाजी कुळये, नंदकुमार मोहीते, संदीप गावडे, राजीव कीर, साक्षी रावणंग, चंद्रकांत पाष्टे, संजय माचिवले, केशव भाताडे व मोठया संख्येने युवक वर्गही उपस्थित होते.

१६ ऑगस्ट, २०२४ रोजी पार पडलेला "लोकनेते शामराव पेजे स्मृति न्यास " या लोकोपयोगी ट्रस्टच्या सामाजिक व शैक्षणिक ध्येयानुसार लांजा तालुक्यातील माचाळ येथील स्थानिक ग्रामस्थांना रक्तचंदन व मसाल्याची रोपे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात शामराव पेजे स्मृति न्यासाचे अध्यक्ष माननीय अँड श्री.सुजित झिमण तसेच न्यासाचे विश्वस्त श्री.विवेक सावंत व डॉ श्री. दिलीप नागवेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.