रत्नागिरीत शेतकऱ्यांना रोपवाटिकांचे वितरण, शामराव पेजे स्मृति न्यास ट्रस्ट, व
जिजाऊ संस्था यांचा पुढाकार
कोकणचे सुपत्र, कुणबी नेते कै.
शामराव पेजे स्मृति न्यास ट्रस्ट आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम वेळोवेळी राबवले जातात.त्याचाच एक भाग रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी खालगाव येथे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून हॉटेल कोकण गारवा येथील हॉलमध्ये खालगाव-जाकादेवी पंचक्रोशीतील तरवळ, पोचरी, कोंड्ये, चवे, परचुरी
उपळे, मेढे, फुणगुस, उक्षी, देण, राईआगरनरळ, चाफे, विल्ये, मांजरे, ओरी, खालगाव, देवूड, बोंड्ये (नार शिंगे) अशा १९ गावातील सुमारे दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना रक्तचंदनाची झाडे वितरीत करण्यात आली. व दोन्ही संस्थांच्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर शामराव पेजे स्मृति न्यासचे अध्यक्ष ॲड. श्री. सुजित झिमण, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अध्यक्ष अनिल नवगणे, ट्रस्टी शामराव पेजे ट्रस्ट हरिश्चंद्र गीते, खजिनदार गजानन चाळके, खजिनदार विवेक सावंत, कृषी तज्ञ डॉ. नागवेकर व्यावसायिक श्री. गणेश जोशी त्याचबरोबर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व शामराव पेजे न्यासाचे सदस्य अॅड महेंद्र मांडवकर, सचिन गोताड, अनिकेत पाटील, साहिल रेवाळे, राज फुटक त्याचबरोबर खालगाव पंचक्रोशीतील इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी मोठयाप्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान केले. व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यास सांगितले. तसेच "रक्तचंदन" झाडाचे महत्व समजावून सांगताना डॉ. नागवेकर (कृषी तज्ञ) यांनी विविध झाडांबद्दल थोडक्यात तज्ञ मार्गदर्शन केले.
शेवटी सर्व शेतकऱ्यांना रक्त चंदनाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. व उपस्थित सर्व मान्यवर व शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
ता. माचाळ येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन. केशर आणि रत्ना आंबा कलमाचे वाटप
दि. १६ ऑगस्ट, २०२३
'भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त "लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास".
या लोक ऊपयोगी ट्रस्ट च्या सामाजिक व शैक्षणिक ध्येयानुसार लांजा तालुक्यातील सहयाद्रीच्या
माथ्यावरील अती दुर्गम असलेल्या जिल्यातील पहीले स्वर्गिय हिल स्टेशन म्हणून नाव लौकिक
मिळवलेल्या माचाळ येथील स्थानिक महिला ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांना केशर / रत्ना या
जातीच्या आंबा कलमांचे वाटप करण्यात आले. या वेळी न्यासाचे सदस्य मा. गजानन चाळके साहेब
यांनी कलम लागवडीचे ऊद्देश आणी लागवडी संबधाने घ्यावयाची काळजी या संबधाने विस्तृत माहीती
दिली लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यासाचे गणेश जोशी यांनी लोकनेते पेजे साहेबांच्या जीवन
प्रवासाचा आढावा घेऊन या न्यासाची सामाजिक जाणीव आणी जबाबदारी मुळे या दुर्गम भागात पोहचलो
असल्याचे सांगितले या नंतर न्यासाचे अध्यक्ष सन्मानीय अँड सुजित झिमण यांनी लोकनेते पेजे
साहेबांच्या राजकीय आणी सामाजिक चळवळीतून सर्व सामान्य जनतेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले
असल्याचे सांगितले त्यांचा आदर्श आणी स्मृती भावी पिढीसाठी प्रेरणादायक असल्याचे सांगितले
तीच प्रेरणा घेऊन आम्ही तुमच्या दारात आलो आहे या पुढेही न्यास विविधमार्गांनी आपल्या
पाठीशी राहील याची ग्वाही दिली.
या नंतर माचाळ मुचकुंदी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणी. लोकनेते. शामराव पेजे स्मृती
न्यासाचे विश्वस्त विवेकराव सावंत यांनी स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकनेते
असलेल्या शामराव पेजे साहेबांच्या नावाने असलेल्या न्यासाकडून दुर्गम भागात आगत्याने
आल्याबद्दल व न्यासाच्या ग्रामिण भागात न्यासाचे कार्य प्रसारीत करण्याच्या भूमिकेबद्दल
मनापासुन आनंद व्यक्त केला आणी या पुढेही असेच विविध मार्गांनी विविध स्तरावर मदत करावी अशी
अपेक्षा व्यक्त केली.
याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने • माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था यांच्या
वतिने अगणवाडी आणी शाळेतील मुलांना शैक्षणीक क्रीडा साहित्य आणी खाऊंचे वाटप करण्यात आले
माचाळ पर्यटन संस्थेच्या संयोजना खाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. सदर या कार्यक्रमास
न्यासाचे अध्यक्ष अँड सुजित झिमण, माजी कृषी अधिकारी गजानन चाळके, गणेश जोशी, अशोक पवार,
गावकर पांडु पाटील स्थानिक शाळा समितीचे विजय पाटील अंगणवाडीच्या रिया पाटील आणी महिला मुले
मुली व ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होती श्री पांडू पाटील गावकर, श्री तुकाराम पाटील व श्री.
गणू मांडवकर यांचे मोलाचे सहकार्य
मिळाले.
माचाळमध्ये रक्तचंदन, मसाला रोपांची लागवड सन २०२४-२५
१६ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडलेला "लोकनेते शामराव पेजे स्मृति न्यास लोकोपयोगी ट्रस्टच्या
सामाजिक व शैक्षणिक ध्येयानुसार लांजा तालुक्यातील माचाळ येथील 'स्थानिक ग्रामस्थांना
रक्तचंदन व मसाल्याची रोपे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात शामराव पेजे स्मृति न्यासाचे
अध्यक्ष माननीय अँड श्री. सुजित झिमण तसेच न्यासाचे विश्वस्त श्री. विवेक सावंत व डॉ श्री.
दिलीप नागवेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास आयोजित
७८व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवडीचा स्तुत्य
उपक्रम उत्साहात साजरा... लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास या बहुउद्देशीय लोकोपयोगी
ट्रस्ट च्या सामाजिक शैक्षणिक चळवळीचे ध्येयानुसार न्यासाने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध
गावांमध्ये वृक्ष लागवड करण्याचे योजिले आहे.
त्यानुसार रत्नागिरी जिल्हयातील लांजा तालुक्यातील सहयाद्रीच्या माथ्यावरील दुर्गम अशा
माचाळ या ब वर्गातील पर्यटन गावांत रक्त चंदन आणी मसाला रोपे इत्या. चे वाटप न्यासाचे
अध्यक्ष मा.ॲड सुजित झिमण. यांचे हस्ते समस्त माचाळ ग्रामस्थांना करण्यात आले. या प्रसंगी
न्यासाचे विश्वस्त (डा. दिलीप नागवेकर विवेक राव सावंत,
महिला विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
-
बालके तसेच
या प्रसंगी डा दिलिप नागवेकर, विश्वस्त, माजी केंद्र प्रमुख नारळ संशोधन केंद्र भाट्ये
)यांनी समयोचित विचार मांडले. पर्यटन आणि भविष्याचा विचार करून वृक्ष लागवड. वनीकरण ए
फलोत्पादन यामुळे होणारे फायदे व त्या संबंधित योजना यावर सविस्तर विवेचन केले आर्थिक
स्वावलंबी होण्यासाठी यावर प्रत्येकांनी भर दिला पाहिजे असे सांगून आपल्या स्थानिक हवामानात
विविध वृक्ष रोपे कलमे कश्या प्रकारे वाढतात यांचा अभ्यास करण्याचीही गरज असल्याचे
प्रतिपादन केले. म्हणुनच प्राथमिक स्वरुपात मसाला रोपे दिली असल्याचे सांगितले.... या
प्रसंगी न्यासाचे अध्यक्ष मा.सुजित झिमण यांनी माचाळवासीयांना पर्यटन केंद्र झाल्यामुळे तद्
अनुषंगाने होणारे फायदे तोटे यांचे सविस्तर विवेचन केले.
स्वातंत्र्या नंतर दुर्लक्षित झालेले गाव आज विवेकराव सावंत यांच्या मुळेच प्रसिद्ध झाले
आहे . या कामी त्यांनी घेतलेली मेहनत अतुलनीय आहे. आता तुमच्या घरा दारा पर्यंत रस्ता आला
आहे. पण आता इथेच थांबुन चालणार नाही. स्व.लोकनेते शामराव पंडो यांना अभिप्रेत असणारा समाज
विकासाच्या जनकल्याणाचा कल्पना आणि सुविधा तळागाळातील शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी
न्यास कटीबद्ध आहे.
फक्त आज नाहीतर पुढेही कायम पणे न्यास तुमच्या साठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणखी आधार
देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले..... या नंतर शामराव पेजे न्यासाचे *विश्वस्त आणी
माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सह.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेकराव सावंत यांनी माचाळ
गाव नुसते पर्यटन केंद्र होऊन चालणार नाही तर गांव विविध मार्गांनी स्वयंपूर्ण होऊन आर्थिक
सुबत्ता आली पाहिजे.
पारंपरिक शेती व्यतिरिक्त सर्वप्रकारच्या जोडधंद्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे
प्रतिपादन केले.
याच करिता न्यासाने अश्या दुर्गम भागातील समाजाकडे लक्ष दिले पाहिजे असे मत न्यासाचे
अध्यक्ष मा सुजित झिमण यांच्या कडे व्यक्त केले. न्यासाचे अध्यक्ष आणी सर्वच विश्वस्तांनी
या सुचनेचा सन्मानपूर्वक विचार केला.आणी गेल्या वर्षी रत्ना आणी केशर या आंबा कलमांचे वाटप
केले. आणखी आज ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्त चंदन या मौल्यवान वृक्षांची
मसाला रोपे देणगी दिली.
मी व्यक्तीशः आणी सर्वच माचाळ ग्रामस्थांच्यावतीने लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यासाचे
अध्यक्ष आणि विश्वस्त यांचे मनापासून आभार मानतो. आणी यापुढे न्यासाचे असेच सहकार्य माचाळ
ग्रामस्थांना लाभेल अशी आशा व्यक्त केली..
याप्रसंगी ... तुकाराम पाटील सखाराम पाटील, विजय मांडवकर गणु मांडवकर, सुगंधा भातडे आनंदी
पाटील इत्या. ग्रामस्थ उपस्थित होते...