श्री. शामराव पेजे जीवनदर्शन

जन्म :
१७ जानेवारी १९१७ रोजी रत्नागिरी येथे झाला.
शिक्षण :
रत्नागिरी शाळा क्र. १ व २, फाटक हायस्कूल, गव्हमेंट हायस्कूल रत्नागिरी, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, कोल्हापूर व राजाराम कॉलेज. कोल्हापूर श्री. शाहू छत्रपतींच्या मराठा बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण, बी.ए.ला मराठी व इंग्रजी हे विषय. कोकणातील मागास कुणबी समाजातले पहिले पदवीधर.
विवाह :
१९४४ साली कु. ललिता जोगळे यांच्याशी रत्नागिरी येथे. त्या कुणबी समाजातील पहिल्या महिला मॅट्रिक्युलेट असाव्यात.
राजकीय क्षेत्रातील कामगिरी :
कोकण गांधी कै. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रेरणेने राजकारणात आले. १९४६ साली उत्तर रत्नागिरी मतदार संघातून मुंबई राज्याच्या विधानसभेवर निवडून गेले. १९५२ - ५७ या काळासाठी दापोली मतदार संघातून पुन्हा आमदार म्हणून निवडले गेले. १९५७ च्या निवडणूकीत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे पराभूत, पण जिल्हयातील सर्वच्या सर्व पराभूत कॉंग्रेस उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविली होती. १९६२-६७ या कालावधीसाठी रत्नागिरी मतदार संघातून पुन्हा महाराष्ट्र विधानसभेवर निवड. १९६७ साली रत्नागिरी मतदार संघातून दुस-यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. १९७१ सालापर्यंत मतदार संघाचेप्रतिनिधीत्व केले. १९७१ साली आमदारकीचा राजीनामा व कॉंग्रेसचे

उमेदवार म्हणून उत्तर रत्नागिरी मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविली व जिंकली. १९७१-७७ लोकसभेचे सदस्य. १९८०-८६ महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य.
काँग्रेस पक्षाचे काम :
बहूजन समाजात कॉंग्रेस पक्ष रुजावा अशी कै. अप्पासाहेबांची इच्छा त्यानुसार जिल्हयाच्या खेडोपाडी दौरे करून शेतक-यांचे प्रश्न हाती घेउन जनमानसात कॉंग्रेस रुजविली व अप्पांचा विश्वास सार्थ ठरविला. जिल्हयातील जनमानसात कॉंग्रेस संघटनेचे मूळ दृढमूल करण्यात श्री. बाळासाहेब सावंतांबरोबर त्यांचाही सिंहाचा वाटा. १९५७-६० जिल्हा कॉंग्रेसचे सेक्रेटरी. १९६० - ६७ जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष.
अन्य संस्थांमधले कार्य :
१९५५ पासून ४ वर्षे जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन, १९६०-६२ डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट बोर्डाचे व्हाईस चेअरमन १९५८-६१ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन १९८५ पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन १९६४ - ६७ जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन याखेरीज महा. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, राज्य मार्केटिंग फेडरेशन, महा. राज्य सहकारी बँक, राज्य भूविकास बँक या संस्थांचे सभासद म्हणूनही काम केलेले आहे.
शैक्षणिक व सामाजिक कार्ये :
कोकणातील सर्वाधिक लोकसंख्येच्या परंतु आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या कुणबी समाजाच्या जागृतीसाठी सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यापासून सदैव प्रयत्नशील, कुणबी समाजाबरोबरच तत्सम अन्य मागासवर्गीय हितही सदैव नजरेसमोर. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ही सर्व समाजाची प्रतिनिधिक संस्था-ती कार्यप्रवण केली. कोकणात तिच्या तालुकावार शाखा काढण्यास कार्यकत्यांना उत्तेजन. शैक्षणिक प्रगतीसाठी वसतीगृह चळवळ. त्यातून तालुकावार वसतिगृहे निघाली. जिल्हयातील ४० मागासवर्गीय अनुदानीत वसतीगृहापैकी १९ वसतिगृहे कुणबी व तत्सम समाजातील मुलांसाठी आहेत. ही वसतिगृहे मान्य करून घेण्यासाठी स्वपक्षीय सरकारशी संघर्ष करण्याचे धाडस दाखविले. ७४ साली त्यासाठी तालुका तालुक्यातील व मुंबईतून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व केले. कुणबी व तत्सम मागास समाजांच्या प्रगतीवरच या विभागाची प्रगती अवलंबून आहे. हे सूत्र धरून या समाजांना शैक्षणिक व आर्थिक सवलती मिळाल्या पाहिजेत असा आग्रह सातत्याने धरला. याची परिणती म्हणून शासनाने 'कुणबी अभ्यास समिती' त्यांच्याच नेतृत्वाखाली नेमली. या समितीचे अध्यक्ष या नात्याने कोकणातील तिन्ही जिल्हयात फिरून कुणबी समाजाची आर्थिक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या पाहाणी केली व आपला अहवाल १९८२ साली शासनास सादर केला. अशिक्षितता, गरीबी व भित्रेपणा यामुळे कुळकायद्याचा फायदा रत्नागिरी जिल्हयातील हजारो शेतक-यांन घेतला नाही. त्यामुळे नोंदी न झालेल्या परिषदा घेउन या प्रश्नाबाबत शासनाचे दरवाजे ठोठावले. तयाची फलश्रूती म्हणून बॅ. पालव यांच्या अध्यक्षतेखाली अशा असुरक्षित कुळांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व उपाय योजन सूचविण्यासाठी 'कूळकायदा समिती नेमली. या समितीचा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्हयात अशा कूळांची संख्या जवळपास लाखभर होईल. कै. अप्पासाहेब पटवर्धनांनी स्थापन केलेल्या कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष या संस्थेमार्फत लांजा व दापो येथे गेली ४०-४५ वर्षे छात्रालये चालविली जात आहेत. रत्नागिरी येथील कै. बाळासाहेब खेरांनी स्थापन केलेल्या यमुनाबाई खेर ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी व ट्रस्टमार्फत चालविल्या जाणा-या सर्वोदय छात्रालयातून रत्नागिरी जिल्हयातील पहिली सुशिक्षितांची पिढी घड ना. हातणकर, आमदार कदम हे या छात्रालयांतून घडले हे नमूद करण्यासारखे.
खामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या शिक्षणसंस्थेचे संस्थापक सदस्य, या संस्थेच्या रत्नागिरी येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलचे संस्थापक. रत्नागिरी येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सभासद व नंतर अध्यक्ष मुख्यमंत्री निधीतून एक लाखची देणगी मिळवकूिन देण्यात सिंहाचा वाटा. पत्रकारिता कोकणातील सर्वात जुन्या अशा 'सत्यशोधक' साप्ताहिकाची धुरा 'संपादक' या नात्याने १९५७ ते १९६२ या काळात वाहिली. १९८१ पासून रत्नागिरीहून प्रसिद्ध होणा-या 'किसानसाद' या साप्ताहिकाचे संस्थापक व मार्गदर्शक.
व्यक्तिमत्वाचे विशेष :
अत्यंत स्पष्टवक्ते नेत्यांच्या रोषाचीही पर्वा न करण्याची वृत्ती. या स्पष्टवक्तेपणा च्या मागे निष्कलंक व्यक्तिगत सार्वजनिक चारित्रय व लोकांच्या न्याय प्रश्नांची बांधिलकी यांचे बळ, या गुणांमुळे विरोधकांतही आदरणीय.