न्यासाचे उद्देश व हेतू

शैक्षणिक कार्य -
अ. सर्व स्तरावरील सर्व प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविणे, त्याकरिता आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व तंत्रशिक्षण संस्था इ. सुरू करणे तसेच चालविणे.
ब. गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पारितोषिके, शिष्यवृत्त्या अशा मार्गाने आर्थिक मदत करणे, तसेच अशा गुणवान व होतकरू परंतु गरीब विद्यार्थ्यांना परतफेडीच्या तत्वावर शिष्यवृत्त्या देणे. क. वरील कलम 'ब' मधील उद्देशाची कार्यवाही करताना खर्च करावयाच्या रकमेपैकी ७५ टक्के रक्क्म कुणबी समाजातील व २५ टक्के रक्कम अन्य इतर मागासवर्गीय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता तसेच अन्य समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करावयाची आहे. मात्र सदर २५ टक्के रकमेत इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

ड. मागास व इतर मागास समाज घटकांमध्ये शैक्षणिक व समाज प्रबोधनाचे कार्य करणा-या संस्था व व्यक्ती यांना पुरस्कार / मदत देणे.
इ. विद्यार्थी / विद्यार्थीनी करिता वसतिगृहे सुरू करणे व चालविणे.
फ. स्त्री शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करणे.

समाजिक कार्य -
अ. अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्ती, कुटुंबकल्याण, साक्षरता प्रसार, पर्यावरण संरक्षण आदी कार्यक्रम स्वतः वा अन्य संस्थांच्या सहकार्याने राबविणे.
ब. संस्थेच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कार्यकर्त्यांची शिबीरे आयोजित करणे.

वैद्यकीय सेवा -
अ. सर्व समाजातील गरजूना किमान खर्चात रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देणे.
ब. स्वतः वा अन्य संस्थांच्या सहकार्याने आरोग्य शिबीरे भरविणे.

शेती व उद्योगधंदे विषयक उपक्रमांना उत्तेजन-
अ. न्यासाच्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी कृषि प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे व ती चालविणे व त्याद्वारा कृषि क्षेत्रातील अद्यावत ज्ञान शेतक-यांना उपलब्ध करून देणे.
ब. कृषिवर आधारीत रेशीम उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग अशा प्रकारचे उद्योग धंदे व्यक्तीगत वा सहकारी तत्वावर चालविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन व सहकार्य करणे.
क. उद्योग - शिक्षण केंद्रे स्थापन करणे व त्याद्वारा युवक-युवतींना व्यवसायाकडे वळविणे.